आंतरराष्ट्रीयराजकारण

नरेंद्र मोदी आणि गोडसेंची विचारधारा एकच- राहूल गांधी

Newslive मराठी – नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारात फारसे अंतर नाही. अशा शब्दात काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी टीका केली आहे.

नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात केरळच्या वायनाडमध्ये राहूल गांधी यांची महारॅली आयोजित केली होती. या महारॅलीत झालेल्या सभेत ते बोलत होते.

नथुराम गोडसे आणि नरेंद्र मोदी यांची एकच विचारधारा आहे. यात फारसे अंतर नाही. परंतु, मी गोडसे यांचा भक्त आहे, असे बोलण्याची नरेंद्र मोदी यांच्यात हिंमत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. मी भारतीय आहे, यासाठी कोणीही सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आहे.

कोण भारतीय आहे. व कोण भारतीय नाही, हे सांगण्यापर्यंत नरेंद्र मोदी कोण आहेत. ज्यावेळी तुम्ही नरेंद्र मोदी यांना बेरोजगारी आणि नोकऱ्यांविषयी विचारले तर ते लोकांचे लक्ष हटवण्यासाठी दुसरा मुद्दा बोलतात, असे राहुल गांधी म्हणाले.

मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे- जितेंद्र आव्हाड