महाराष्ट्रराजकारण

कोणाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते हे महाराष्ट्र सरकारने आता तरी सांगावे : भाजपा

Newsliveमराठी – अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकार नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे याबद्दल आता तरी खुलासा करावा असं भाजपाने म्हटलं आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय देत तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसैन यांनी ट्विटवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “आता सरकारची भूमिका बदलेली दिसत आहे. सुशांतच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून करण्याचा आदेश आल्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांची भूमिका बदलेली दिसत आहे. संजय राऊत सुशांतबद्दल काय काय वक्तव्य करत होते. या प्रकरणामध्ये आतापर्यंत कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता याचे उत्तर आता महाराष्ट्र सरकारने द्यायला हवं,” असं ट्विट हुसैन यांनी केलं आहे.

‘अब बदले बदले सरकार नजर आते हैं’ महाराष्ट्र सरकार के नेताओं के बयान #CBIForSSR जांच के आदेश के बाद बदल गये हैं,यही @rautsanjay61 किस तरह की बयानबाजी #SushantSinghRajpoot
के बारे में कर रहे थे ।अब महाराष्ट्र सरकार को जवाब देना चाहिए की आखिर वो अब तक किसे बचाने की कोशिश कर रहे थे