महाराष्ट्रलक्षवेधी

मराठा समाजाकडून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. मराठा समाजाला आणि राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. पण, आता पुन्हा एकदा मराठा संघटनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाने अर्ज करण्यात आला आहे. मराठा संघटनेच्या वतीने विनोद पाटील यांच्या वतीने दिनांक 11 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात यांच्याकडे अर्ज करण्यात आला आहे. या अर्जात नागेश्वर राव खंडपीठाने मराठा आरक्षणाला स्थगिती देताना इंद्रा सावनी खटल्याचा दाखला दिलेला आहे.

यामध्ये सर न्यायाधीशांना विनंती केलेली आहे. इंद्रा सावनी खटल्यामध्ये मागासवर्गीय आरक्षणाबाबत आहे. मराठा आरक्षण हे सामाजिकरित्या, शैक्षणिक मागास हा नवीन प्रवर्ग करून आरक्षण देण्यात आलेले आहे. यामुळे आता या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निर्णयामुळे मराठा समाजातील तरुणांचे फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये नुकसान होत आहे. सदर अर्ज हा प्रकरण जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री, महाराष्ट्र मुख्य सचिव व विनोद नारायण पाटील यामध्ये करण्यात आलेला आहे. विनोद पाटील यांच्या वतीने संदीप देशमुख यांनी अर्ज दाखल केला.

लवकर निर्णय नाही झाला तर पुन्हा आंदोलन केले जाईल असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मराठा समाज नाराज झाला आहे.