महाराष्ट्रलक्षवेधी

स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने बुधवारी केंद्रीय मोटर वाहन अधिनियम 1989 मध्ये दुरुस्ती करून हायड्रोजन इंधन पेशीद्वारे चालविलेल्या मोटार वाहनांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठीच्या निकषांची माहिती दिली आहे.

स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने हायड्रोजन इंधन सेल-आधारित वाहनांच्या (Hydrogen fuel cell-based vehicles) सुरक्षा मूल्यांकन मानकांना अधिसूचित केले आहे. मंत्रालयाने याबाबत असे म्हटले आहे की,’ स्वच्छ उर्जेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली असून त्याअंतर्गत नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

यासंदर्भात माहिती देताना मंत्रालयाने म्हटले आहे की या पावलामुळे देशातील हायड्रोजन इंधन सेल आधारित वाहनांना चालना मिळण्यास मदत होईल आणि पर्यावरणास अनुकूल अशी उर्जा वापरणार्‍या वाहनांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान देखील कमी होईल. अशा वाहनांचे उत्पादक आणि पुरवठा करणारे यांच्याकडे वाहन चाचणीसाठी आंतरराष्ट्रीय मानके उपलब्ध केली गेली आहेत.