आंतरराष्ट्रीयराजकारण

मोदी सरकार चीनला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत

Newsliveमराठी – चीनमधील पीपल्स लिबरेशन आर्मीने लडाखमधील पँगाँग टीएसओ आणि गोग्रा-हॉट स्प्रिंग्स या भागातून अजूनही पूर्णपणे माघार घेतलेली नाही. दिलेला शब्द पाळलेला दिसत नाही. त्यामुळे केंद्रातले नरेंद्र मोदी सरकारला चीनला आर्थिक आघाडीवर आणखी एक झटका देण्याचा विचार करत आहे. सीमेवर दादागिरी केलीत तर, व्यापार, व्यवसायात त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, भारत सरकारला हाच संदेश चीनला द्यायचा आहे.

या घडामोडींशी संबंधित असलेल्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानुसार, चीनचा अभ्यास असणाऱ्या चायना स्टडी ग्रुपची सोमवारी बैठक झाली. यामध्ये चीनच्या लडाखमधील कारवाया, तिबेटच्या अक्साई चीन भागात पीएलए दाखवत असलेली आक्रमकता यावर चर्चा झाली. चायना स्टडी ग्रुपमध्ये वरिष्ठ मंत्री, नेते आणि नोकरशहांचा समावेश आहे. या समितीकडून चीन बरोबर रणनितीक दृष्टीने संबंध कसे असावेत? याविषयी शिफारसी केल्या जातात. हिंदुस्थान टाइम्सने याबाबत बातमी दिली आहे.