महाराष्ट्रराजकारण

मोदी सरकार तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत आहे- राहुल गांधी

मोदी सरकारच्या धोरणांवर सातत्यानं टीका करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘अर्थव्यवस्था की बात’ व्हिडीओ मालिकेच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करणार आहे. राहुल गांधी यांनी पहिला व्हिडीओ ट्विट केला असून, देशातील असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा असल्याचा आरोप केला आहे.

“नोटबंदी, जीएसटी व लॉकडाउन हे ती चुकीचे निर्णय मोदी सरकारनं घेतले. या तिन्हींचा उद्देश असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा असून, तुम्हाला लुटलं जातंय. गुलाम बनवण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे लढा देण्यासाठी एकजूट व्हा,” असं आवाहन राहुल गांधी यांनी देशवासीयांना केलं आहे.

मोदी सरकारनं घेतलेल्या नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाउनच्या निर्णयांची पोलखोल करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीयांना एकजूट होण्याचं आवाहन केलं आहे. राहुल गांधी यांनी ‘अर्थव्यवस्था की बात’ या व्हिडीओतून मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. भाजपा सरकारनं असंघटित अर्थव्यवस्थेवर आक्रमण केलं आहे आणि तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.