कोरोनामहाराष्ट्र

देशातील सर्वाधिक गंभीर परिस्थिती पुण्यात- प्रकाश जावडेकर

कोरोनाचे रुग्ण देशात वाढतच आहेत. याचा आता आरोग्य विभागावर मोठा ताण येत आहे. देशात सर्वाधिक गंभीर परिस्थिती ही पुण्यात आहे.अस मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. पुण्यातील कोरोनाच्या गंभीर स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आज पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी विभागीय स्तरावरचा कोरोना स्थितीची सादरीकरण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमोर सादर केले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना केल्या. जिथे गंभीर परिस्थिती आहे तिथे अधिकचे लक्ष घालून त्यामागची कारणे शोधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना जावडेकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहे.

तसेच पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही शहरातील कोरोना स्थितीचे सादरीकरण केले. शरद पवारांनी देखील आता पुण्यात लक्ष दिले आहे. कालपासून त्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत.