आंतरराष्ट्रीयमनोरंजन

‘वॉर’ चित्रपटाने काढले कमाईचे सर्व विक्रम मोडीत

Newslive मराठी- अभिनेता ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा ‘वॉर’ चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून बॉक्स ऑफिस वर प्रदर्शित झाला आहे.

हा चित्रपट हिंदी,तामिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अन्य चित्रपटांचे बॉक्स ऑफिसच्या कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.’वॉर’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी 53.35 कोटी रुपयांची कमाई करून, आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला आहे.

याआधी पहिल्याच दिवशी कमाईचा विक्रम ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ (50.75 कोटी) या चित्रपटाच्या नावावर होता. या चित्रपट पाहण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
‘वॉर’ चित्रपटानंतर पहिल्या दिवशी जास्त कमाई केलेले

यावर्षीचे चित्रपट खालीलप्रमाणे
भारत:- (42.30 कोटी)
मिशन मंगल:- (29.16 कोटी)
साहो (हिंदी):- (24.40 कोटी)
कलंक:- (21.60 कोटी)
केसरी:- (21.06 कोटी)
गली बॉय:- (19.40 कोटी)

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi