महाराष्ट्रलक्षवेधी

एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या

Newslive मराठी – अमरावतीमध्ये एकतर्फी प्रेमातून भर दिवसा युवतीची गळा चिरुन हत्या’ करण्यात आली.

अमरावती येथील चुनाभट्टी परिसरात मंगळवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. यामुळे एकच हलकल्लोळ माजला. 17 वर्षीय तरुणी ट्यूशनला जात असताना आरोपी किरण म्हस्केने हल्ला करत तिच्यावर 17 वेळा चाकूने वार केले.

त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी किरणला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.