महाराष्ट्रलक्षवेधी

‘संभाजी बिडी’चे नाव आता बदलणार, आंदोलनाला मोठं यश

संभाजी बिडी हे नाव बदलण्यात यावे यासाठी अनेकवेळा मागणी केली जात होती. बिडी उत्पादनात अग्रेसर असलेल्या साबळे वाघिरे कंपनीने आपल्या उत्पादनाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक वर्षांपासून ‘संभाजी बिडी’ नावाने उत्पादनाची विक्री होत होती. याला राज्यभरातील शिवप्रेमींसह विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या विरोधानंतर कंपनीने नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील अनेक वर्षांपासून राज्यात संभाजी बिडी नावाने उत्पादनाची विक्री होत आहे. यावर आक्षेप घेत वेळोवेळी सामाजिक संघटनांनी आंदोलन करून उत्पादनावरून संभाजी हे नाव हटवण्याची मागणी केली होती.

काही दिवसांपूर्वी हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. शिवभक्तांनी आक्रमक भूमिका घेत नाव बदलण्याची मागणी केली होती. शिवभक्तांच्या या मागणीला यश आले आहे. याबाबत कंपनीचे संचालक संजय साबळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शिवधर्म फाऊंडेशनने पुरंदर किल्यावर उपोषण सुरू केले होते. अखेर या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.