कृषीमहाराष्ट्र

शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज, शेतकऱ्याने पाठवली थेट विमानाची तिकिटे

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 30 लाखांवर पोहोचली आहे. भारतात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे, आणि आपलं गाव गाठलं आहे. गावी गेलेल्या कामगारांना परत कामावर बोलावणं हे व्यावसायिकांसाठी आव्हान आहे. मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी शक्कल लढवली जात आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे.

लॉकडाऊनमध्ये घरी गेलेल्या प्रवासी मजुरांची आता कमतरता भासू लागली आहे. दिल्लीच्या शेतकऱ्यांना देखील आता शेतात काम करण्यासाठी मजुरांची आवश्यकता आहे. शेतात काम करायला मजूर नाहीत म्हणून एका शेतकऱ्याने मजुरांना थेट विमानाचं तिकीट पाठवल्याची घटना समोर आली आहे. पप्‍पन सिंह असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी मजुरांसाठी विमानाचं तिकीट बूक केलं आहे. पप्‍पन सिंह यांची मशरुमची शेती आहे. शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज आहे. यामुळे अनेकांची गैर सोय होत आहे.

पप्पन यांनी 20 प्रवासी मजुरांसाठी विमानाचं तिकीट बूक केलं आहे. हे प्रवासी मजूर बिहारमधील पाटणा विमानतळावरून लवकरच दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी रवाना होतील. मिळालेल्या माहितीनुसार, पप्पन सिंह दिल्लीतील तिगिपूर गावचे रहिवासी आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून मशरुमची शेती करतात. यामुळे परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.