महाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रासाठी पुढचे 3 महिने धोक्याचे- मुख्यमंत्री

कोरोनाचे रुग्ण देशात वाढतच आहेत. राज्यात देखील सर्वच महत्वाच्या शहरात रुग्णसंख्या वाढतच आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा वेग वाढत असतांनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबई महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक आणि अधिष्ठाता यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढवा घेतला यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्रासाठी पुढचे तीन महिने धोक्याचे आहेत.

राज्यात ऑक्सिजनचं उत्पादन वाढविण्यात येणार आहे. लोकांनीही निष्काळजीपणा न दाखवता जागरुक राहावे. त्यामुळे कोरोनाचं संकट आपण रोखू शकतो असं मतही त्यांनी व्यक्त केलं. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी वाढ होत आहेत. शनिवारी आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आढळली.

मुख्यमंत्री म्हणाले, अनलॉक केल्यानंतर मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही निश्चितच काळजीची गोष्ट असली तरी मुंबई पालिकेची सक्षम तयारी पाहिल्यानंतर मला खात्री आहे आपण हा प्रादुर्भाव चांगल्यारीतीने रोखू शकू. यामुळे आता पुढील काही महिने काळजी घेण्याची गरज आहे.