आंतरराष्ट्रीयदेश-विदेशबातमी

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 70 लाखांवर

Newslive मराठी- जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 1 कोटी 70 लाखांचा टप्पा ओलांडला असून सुमारे 99 लाख लोक बरे झाले आहेत. सध्या जगभरात 30 लाखांहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. जॉन हाफकिन विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार कालपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 70 लाख 29 हजार 155 इतकी झाली आहे. तर 99 लाख 16 हजार 230 जण करोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत जगभरात 6 लाख 67 हजार 11 जणांचा या साथरोगामुळे मृत्यू झाला आहे. 210 हून अधिक देशांत करोनाने थैमान घातले असून अमेरिका, ब्राझिल, भारत आणि रशिया या देशांमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे.

कोरोनाबाधित असणारे किंवा करोनाची लक्षणे असणाऱ्यांच्या विलगीकरण स्वविलगीकरणाच्या कालावधीमध्ये ब्रिटनने वाढ केली आहे. यापूर्वी सात दिवसांचे विलगीकरण केले जायचे. मात्र आता 10 दिवस विलगीकरण करण्याचा निर्णय आणि त्या संदर्भातली नियमावली मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काल जाहीर केली.

महत्वाच्या बातम्या-

-‘त्या’ पीडितेला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार खासदार नवनीत राणा

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-मराठा तरुणांना आर्थिक दुर्बल 10 टक्के आरक्षण नाही; सरकारी जीआरवर विनोद पाटील आक्रमक

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi