कोरोनादेश-विदेश

देशात करोनाबाधितांची संख्या २८ लाखांवर तर चोवीस तासात ६९,६५२ नव्या रुग्णांची नोंद

Newsliveमराठी – जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांची संख्या सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चाचण्यांची संख्या अधिक होत असल्यामुळे नव्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये देशात ६९ हजार ६५२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यानंतर देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने २८ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे गेल्या चोवीस तासांत ९७७ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ६९ हजार ६५९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ९७७ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. तसंच यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या २८ लाख ३६ हजार ९२६ वर पोहोचली आहे. आतापर्यंतस २० लाख ९६ हजार ६६५ रुग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत ५३ हजार ८६६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.