कोरोनादेश-विदेश

देशातील रुग्णसंख्या २५ लाखांपेक्षा जास्त

Newsliveमराठी – मागील चोवीस तासांत देशात करोनाच्या ६५ हजार रुग्णांचे निदान झाले, तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील करोना रुग्णांची संख्या २५ लाख २६ हजार १९२ वर पोहोचली आहे. देशात आत्तापर्यंत ४९ हजार ३६ रुग्ण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली आहे.

रुग्णसंख्या वाढत असली तरी सुमारे तितक्याच संख्येने रुग्ण करोनामुक्त होत असून गेल्या चोवीस तासांमध्ये उच्चांकी ५७ हजार ३८१ रुग्ण बरे झाले. करोनामुक्त होण्याचे प्रमाण आता ७१.६० टक्क्यांवर गेले आहे. ३२ राज्यांमध्ये हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. १२ राज्यांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही अधिक आहे.