महाराष्ट्रराजकारण

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. याच पार्श्वभूमीवर
आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन १ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या धोक्यामुळे पहिल्यांदाच अधिवनेशनात मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं अधिवेशन एकत्र घेण्यात येणार आहे. तर सामाजिक अंतर ठेवतच संसदेत खासदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिवेशनाआधी खासदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यात लोकसभेचे ५ खासदार आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आढळले आहेत. हा आकडा आणखी वाढतो का हे देखील पाहावं लागेल. सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नोत्तराचा तास रद्द केला आहे. इतर वादग्रस्त मुद्दयांच्या चर्चेसह विधेयकांबाबत हे अधिवेशन कसे पार पडते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या अधिवेशनात सहभागी होणार नाहीत तसेच राहुल गांधी देखील सहभागी होणार नाहीत. सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी त्या अमेरिकेत गेल्या आहेत. यामुळे काँग्रेसचे इतर केंद्रीय नेते हे काँग्रेसची भूमिका पार पाडणार आहेत.