लक्षवेधी

100 फुट डोसा बनवण्याचा विक्रम

Newslive मराठी- चेन्नईतले सेलिब्रिटी शेफ डॉ. विनोद कुमार आणि त्यांच्या ६० शेफ्सच्या टीमने १०० फुटी डोसा तयार केला. यामुळे गिनीज बुकात नाव नोंदवण्यासारखा विश्वविक्रम झाला आहे.

हा डोसा आयआयटी मद्रासच्या संकुलात बनवला. या डोशासाठी ३७.५ किलो तांदळाचे पीठ वापरले. याआधी २०१४ मध्ये अहमदाबादमध्ये दसपल्ला हॉटेलने ५४ फुटाचा डोसा तयार केला होता. आता विनोद कुमार यांनी तो विश्र्वविक्रम मोडून आपल्या नावी केला.