महाराष्ट्रशैक्षणिक

शाळा 21 सप्टेंबरपासून होणार सुरू, केंद्र सरकारने दिले आदेश

कोरोनामुळे देशात सर्व काही ठप्प आहे. कोरोनामुळे लॉकडाउन केल्यानंतर देशातील शाळाही बंद होत्या. अनलॉकच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये शाळांना परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र आता केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. सरकारच्या आदेशानुसार 9 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच शाळा उघडता येणार आहे.

केंद्राने याबाबत नियमावलीसुद्धा जाहीर केलीआहे. सरकारने दिलेल्या आदेशानुसार कंटेन्मेंट झोनमध्ये शाळा उघडता येणार नाहीत. कंटेंनमेंट झोनच्या बाहेरच शाळा उघडता येतील.

शाळा सुरु केल्या तरी प्रार्थना, खेळ आणि इतर कार्यक्रम सुरु कऱण्यास परवानगी नाही. कारण यावेळी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम महत्वाचा असून याबाबत सक्तीने सूचना केल्या आहेत.

सरकारने शाळांमध्ये सॅनिटायझेशनबाबतही काळजी घ्यावी तसेच नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षकांकडून माहिती मिळाल्यानंतर शाळेला जाता येईल. कंटेनमेंट झोनमध्ये असेलल्या विद्यार्थ्यांना शाळेला जाता येणार नाही. विद्यार्थ्यांना शाळेतसुद्धा पालक आणि शिक्षकांच्या लेखी परवानगीनंतरच जाता येईल. लहान मुलांच्या शाळा कधी सुरू होणार याबाबत अजूनही निर्णय झाला नाही.