Newslive मराठी- राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती गंभीर आहे. राज्य सरकार दुष्काळाशी दोन हात करण्यास समर्थ आहे. अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यंदा राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. मात्र, याविरोधात सरकार आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीच्या बळावर आपण दुष्काळाशी दोन हात करू यावर्षी राज्य सरकारने लवकर पाऊले उचलत दुष्काळ जाहीर केला. असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, शहर विकासासाठी राज्य सरकारकडून कुठली ही कमतरता भासू दिली जाणार नाही. शहरातील रस्ते विकासासाठी पहिला टप्पा ८८ कोटी रुपयांचा दिला. दुसरा टप्पाही तातडीने दिला जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ४४८ घरांच्या निर्मिती, नगर पालिकेच्या सभागृहाचे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे सभागृह असे नामकरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा. newslivemarathi
शेतकऱ्याची समुळ जात नष्ट करण्याचा सरकारचा डाव आहे- धनंजय मुंडे
प्रियंका गांधीच्या निवडीमुळे आमच्यामध्ये `उत्साह संचार’ला आहे….