कोरोनामहाराष्ट्र

राज्य सरकारने कोरोना टेस्टचे दर केले कमी, नवे दर निश्चित

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. आरोग्य यंत्रणा कोलमडू लागली आहे. आता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना टेस्टचे नवे दर निश्चित करण्यात आले आहेत. कोरोना टेस्टचे नवे दर १,२०० रुपये एवढे असतील. १,९०० रुपयांवरुन हे दर १,२०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. कोरोना टेस्टसाठी खासगी लॅब आता १,२०० रुपयांच्या वर दर आकारू शकणार नाहीत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  सुरुवातीच्या काळात राज्यात कोरोना टेस्टसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. या तक्रारींनंतर कोरोनाचे दर ४,५०० हजार रुपयांच्या घरात आणण्यात आले. नंतर हेच दर २,४०० ते २,८०० रुपये करण्यात आले. आता हे दर १,२०० रुपयांवर आणण्यात आले आहेत.

यामुळे सुरुवातीला जास्त असणारे दर हे मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. ही एक दिलासादायक बाब आहे. सुरुवातीला जास्त पैसे घेऊन यामध्ये फसवणूक केली जात होती. मात्र राज्य सरकारने यावर नियंत्रण आणले आहे.