बातमीमहाराष्ट्र

पुणे महापालिकेचे क्रिडा धोरण मंजुरीसाठी राज्य शासनाकडे

Newslive मराठी – पुणे महापालिकेने तयार केलेले क्रीडा धोरण 6 वर्षांनी राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले.

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्रात प्राविण्य मिळवता यावे, यासाठी 2013 मध्ये क्रीडा धोरण तयार केले होते. पण यात त्रुटी होत्या.

दरम्यान,  2018 मध्ये यावर क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांच्या सूचना मागवून यातील त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या. आता दोन आठवड्यापूर्वी हे सुधारित धोरण क्रिडा विभागाकडे पाठविण्यात आले.