महाराष्ट्र लक्षवेधी

ठाकरे सरकार पोलीस खात्यातील साडे बारा हजार पदे भरणार

राज्य सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलीस भरती ही शहरी आणि ग्रामीण तरुण, तरुणींसाठी मोठी संधी असेल. त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती कॅबिनेटच्या बैठकीनंतर देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्रात पोलीस दलातील १२ हजार ५३८ पदं लवकरच भरली जाणार असल्याची माहिती दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुखांनी ट्विट करून दिली होती. आज मंत्रिमंडळात याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर अखेरपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं देशमुख यांनी ट्विट करून सांगितलं होतं.

त्यामुळे लवकरच पोलीस भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यावर कोरोनावर मोठं संकट आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील हजारो कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत पोलीस दलातील पावणे दोनशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे आता तरुणांना ही एक मोठी संधी चालून आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *