महाराष्ट्रराजकारण

मतदानादिवशी प्रचार करणारा कुत्रा ताब्यात

Newslive मराठी-  लोकसभेचे शेवटच्या टप्प्यातील मतदान नंदूरबारमध्येही पार पडले. यावेळी चक्क कुत्र्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे कुत्रे चक्क मतदानादिवशी भाजपचा प्रचार करत होते. त्याच्या शरीरावर भाजपाचे निवडणूक चिन्ह आणि ‘मोदी लाओ, देश बचाओ’ अशा संदेशाचे स्टीकर्स चिकटवलेले होते. यामुळे कुत्र्यासह मालक एकनाथ चौधरीला (65) पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, चौधरीवर आयपीसी कलम 171 (अ) अंतर्गत तक्रार दाखल झाली.