कृषीमहाराष्ट्र

टोमॅटो पिकांतून तरुणाने कमावला वीस गुंठ्यांतून चार लाखांवर नफा

भारतात सीएमआयच्या सर्वेक्षणानुसार भारतात बारा कोटीच्यावर लोक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहे. काहींनी उत्पन्नाचा स्त्रोत चालू राहावा यासाठी नवीन व्यवसाय सुरु केले आहेत. मराठवाड्यातही कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्चअखेरीला लॉकडाउन सुरू झाले आणि अनेकांच्या रोजगारांना ‘लॉक’ लागले. पण यातून एका तरुणाने वेगळी वाट शोधून त्यातून भरघोस नफाही कमविला आहे.

बीज जिल्ह्यातील डोईठाण (ता.आष्टी) येथील अण्णासाहेब तरटे या तरुण शेतकऱ्याने २० गुंठे क्षेत्रावरील शेतात टोमॅटो पिकातून चार लाखा रुपयांवर नफा कमावला आहे. नोकरी नसल्याने ते गावातच शिकवणी घेत. त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबर त्यांना आमदणीही बरी होई; पण लॉकडाउनमुळे त्यांच्या शिकवणीलाही ‘लॉक’ लागले. करायचे काय, म्हणून त्यांनी कोरडवाहू जमिनीत जून महिन्यात २० गुंठे क्षेत्रावरील शेतात टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. आंतरमशागत, फवारणी, खत- पाणी वेळेवर दिल्याने पीकही भन्नाट आले.

सुरवातीच्या दहा तोड्यांतून त्यांना खर्च जाता दोन लाख रुपयांचा नफा राहिला. पुढच्या तोंड्यांतूनही आणखी एक लाख रुपयांचे खर्च जाता उत्पन्न शिल्लक राहिले. आणखी एक लाख रुपयांचे टोमॅटो निघतील, असे श्री.तरटे यांनी सांगितले आहे. त्यांचा प्रयोग तरुणांना उमेद देणारा ठरत आहे.