मनोरंजनमहाराष्ट्र

दसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता

कोरोना मुळे मार्च पासून बंद असलेल्या मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थियेटर्सना ९ हजार कोटीचा नुकसान झाला आहे. थियेटर्स पुन्हा सुरु व्हावीत यासाठी सरकारवर दबाव वाढत चालला आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन आणि केंद्र सरकार यांच्यात या संदर्भात अनेक चर्चा झाले असून ऑक्टोबर मध्ये येत असलेल्या दसऱ्यापासून थियेटर्स सुरु होऊ शकतील असे संकेत दिले जात आहे.

चित्रपट वितरकांच्या मते लॉकडाऊन मध्ये झालेले नुकसान पुढील वर्षात रिलीज होत असलेल्या चित्रपटातून भरून निघू शकेल. चित्रपट निर्माते गिरीश जोहर यांच्या मते २०२१ मध्ये मेगाबजेट आणि बडे स्टार्स असलेले अनेक चित्रपट येत असून ही संख्या साधारण १६ आहे. त्यातूनच ४ हजार कोटी मिळू शकणार आहेत.

देशातील मुख्य मल्टीप्लेक्स चेन कार्निवलचे वरिष्ठ उपाध्यक्ष कुणाल सहानी म्हणाले, दिवाळी, दसरा, ईद, २ ऑक्टोबर, होळी या काळात नेहमीच चित्रपट प्रदर्शनाची एकच गर्दी होते. आता थियेटर्स उघडण्याची शक्यता नजरेत आल्याने अपूर्ण चित्रपटांचे काम पूर्ण करण्यास वेग आला आहे. त्यामुळे नुकसान भरून येण्यास मदत होईल.