महाराष्ट्रराजकारण

…तर मी मुंबई सोडून देईन- कंगणा राणावत

ड्रग्ज प्रकरणी सध्या रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आता अभिनेत्री कंगणा राणावतची चौकशी होणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. यावर कंगणाने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी सध्या जोरदार वाद सुरू आहे. मुंबईतील कंगनाच्या बंगल्याची देखील पाहणी करण्यासाठी पालिकेचे अधिकारी आले होते. त्यांनी पाहणी देखील केली आहे.

अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर कंगणा राणावतने ट्विट केलं असून आपली ड्रग्ज टेस्ट करण्याचं आवाहन दिलं आहे. मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा, असं कंगणाने म्हटलं आहे.

जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहतेय, असं ट्विट कंगणाने केलं आहे.कंगणा राणावत आणि अध्ययन सुमन यांच्यात संबंध होते. अध्ययन सुमनने एका मुलाखतीत कंगना ड्रग्ज घेत असून आपल्यावरही जबरदस्ती केली होती असं सांगितलं होतं. मुंबई पोलीस याप्रकरणी अधिक माहिती घेत आहेत, असं अनिल देशमुख म्हणाले. आता कंगनाच्या या भूमिकेवर देशमुख काय प्रतिक्रिया देणार हे लवकरच समजेल.