महाराष्ट्रराजकारण

…..तर मी राजीनामा देणार- उदयनराजे

मी कधी राजकारण करत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच. इतर समाजांप्रती मला आदर आहे. मात्र प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. न्यायालयाने सर्वांना समान अधिकार द्यावेत. न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणार हे स्वाभाविक आहे.

असं वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी केलं. तसेच मराठा आरक्षणाबाबत एक ठोस निर्णय व्हावा, अशी इच्छा त्यांनी केली. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार.

राज्य सरकारने साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती जाहीर केली. मात्र सरकारच्या या निर्णयाला खासदार संभाजीराजे, देवेद्र फडणवीस यांच्यासह मराठा समाजाच्या नेत्यांनी विरोध केला. यावेळी त्यांना पोलीस भरतीबाबत विचारले असता मी पोलीस भरतीवर भाष्य करणार नाही, असं उदयनराजे म्हणाले.