महाराष्ट्रराजकारण

..तेव्हा काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत- अजित पवार

सध्या भारतात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळत आहेत. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थीती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. येत्या काही दिवसांत पुण्यातील कोरोनाची परिस्थीती आटोक्यात आली नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

पुण्यात कोरोना परिस्थीतीबाबत आढावा घेण्यासाठी शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी पुण्यातील विधानभवन सभागृहात अधिकाऱ्यांसोबर उपमुख्यामंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. मुंबई सारख्या मोठ्या शहरात कोरोना आटोक्यात येऊ शकतो मग पुण्यात काय अडचण आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी असून अधिकाऱ्यांना फ्री हॅन्ड दिल्यानंतर देखील परिस्थीती का सुधारत नाही, असा प्रश्न अजित पवारांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे.

पुढील काही दिवसात पुण्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला नाही तर, पुढील बैठकीत यातील काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत’, अशा शब्दात अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना ठणकावलं आहे.

या बैठकीत संबंधीत विभागांचे अधिकारी उपस्थीत होते. कोरोना आटोक्यात न आल्यास अधिकाऱ्यांचीही गय केली जाणार नाही हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं. तसेच अधिकाऱ्यांकडून कामात कोणतीच दिरंगाई होता कामा नये, असेही अजित पवारांनी सांगितले आहे.