बातमी

शेळीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

NEWSLIVE मराठी-  गरिबांची गाय म्हणून महात्मा गांधी यांनी उल्लेख केलेल्या शेळीचे व्यावसायिक महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. शेळीचे दुध पचनास हलके असल्याने नवजात शिशू व चिमुरड्यांना आईंच्या दुधाचा पर्याय म्हणून शेळीचे दुध द्यावे, असे आहारतज्ञ सांगतात.

  • शेळीचे दूध गाईच्या दुधापेक्षा जास्त पोषक आहे.
  • शेळीच्या दुधामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत बनवते.
  • डेंग्यू, चिकनगुनिया तापामध्ये प्लेट्स वाढविण्यात शेळीचे दूध उपयुक्त आहे.
  • शेळीचे दूध नवजात बाळाचे आतडे मजबूत करते आणि बाळाचा शारीरिक विकास वाढविण्यात मदत करते.
  • शेळीचे दुध पिण्यामुळे पचनतंत्र सुधारण्यास मदत होते.
  • शेळीच्या दुधात कॅल्शिअम, फाॅस्फरस, पोटॅशिअम ही मॅग्नेशिअम ही खनिजे इतर दुधापेक्षा जास्त प्रमाणात आढळतात.

स्वित्झर्लंडसारख्या देशामध्ये शेळीला ‘स्वीस बेबीज फॉस्टर मदर’ अर्थात लहान बाळाची पालकमाता म्हटले जाते. तर, इतर काही युरोपीय राष्ट्रांमध्ये शेळीला ‘वेटनर्स ऑफ इनफंट्स’ अर्थात ‘अर्भकाची दाई’ अशी ओळख आहे.