व्यापार

‘या’ तीन बँकांमध्ये असतील खाती, तर वाढू शकते तुमची डोकेदुखी

Newslive मराठी-  मोदी सरकारने तीन मोठ्या बँकांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली. त्यामुळे बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँकेचे विलीनीकरण होणार असून त्यानंतर ही देशातील तिसरी सर्वात मोठी बँक बनेल.

या बँकेच्या विलनीकरणामुळे सर्वसामान्य खातेदारांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. बँकांच्या विलीनीकरणानंतर बँकेच्या शाखांचे आयएफएससी कोड बदलू शकतात, अशी माहिती पंजाब एँड सिंध बँकेचे माजी मुख्य महाव्यवस्थापक जी. एस. बिंद्रा यांनी दिली.

या प्रक्रियेची सुरुवात लवकरच होणार असून तेव्हा तुमचे या बँकांत खाते असल्यास तुमचे चेकबुक, खाते क्रमांक आणि कस्टमर आयडी बदलू शकते. तसेच तुम्हाला पुन्हा नव्याने केवायसीची प्रक्रियाही करावी लागू शकते. त्यामुळे तयार राहा.