आरोग्य लाइफस्टाईल

या शाकाहारी पदार्थामध्ये असतात भरपूर प्रोटीन

 Newslive मराठी:  प्रोटीन एक महत्त्वाचं पोषक तत्व आहे, जे अनेक पदार्थांमधून शरीराला मिळतं. चांगल्या आरोग्यासाठी ज्याप्रकारे योग्य प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स गरजेचे असतात तसेच प्रोटीन सुद्धा शरीराच्या विकासासाठी आवश्यक आहे. प्रोटीन केवळ बॉडी बनवणाऱ्यांसाठीच गरजेचं नाही. तर शरीराच्या रोजच्या कामकाजांसाठीही महत्त्वाचं असतं. प्रोटीन शरीरात नवीन पेशी आणि हार्मोन्स तयार करण्याचं काम करतं. प्रोटीनमुळे शरीरात लाल रक्तपेशीची निर्मिती, सामान्य मेटाबॉलिज्म तयार होतं.

१)ओट्स-  नाश्त्यासाठी हा एक चांगला पर्याय ओट्स मानला जातो. यात फायबर, मॅग्नेशिअम, मॅगझिन, थियामिन(व्हिटॅमिन बी १) आणि इतर पोषक तत्वे असतात. अर्धा कप ओट्समध्ये ३०३ कॅलरीसोबत १३ ग्रॅम प्रोटीन असतात.

 

२) ब्रोकोली-  ब्रोकोली एक आरोग्यदायी भाजी आहे. यातून व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात मिळतं. याने कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो. ब्रोकोलीमध्ये वेगवेगळे बायोअॅक्टिव पोषक तत्वही भरपूर प्रमाणात असतात. एक कप ब्रोकोलीमध्ये केवळ ३१ कॅलरी आणि ३ ग्रॅम प्रोटीन असतात.

 

३) बदाम-  फायबर, व्हिटॅमिन ई, मॅगझीन आणि मॅग्नेशिअम हे पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. २८ ग्रॅम बदामांमध्ये १६१ कॅलरीसोबतच ६ ग्रॅम प्रोटीन असतं.

४) भोपळ्याच्या बिया-  भोपळ्याच्या बिया खाता येऊ शकतात. यात आयर्न, मग्नेशिअम आणि झिंकसहीत आणखीही काही पोषक तत्वे असतात. प्रोटीनबाबत सांगायचं तर २८ ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये १२५ कॅलरीसोबत ५ ग्रॅम प्रोटीन आढळतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *