आंतरराष्ट्रीयआरोग्य

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ व्यायाम उपयुक्त

अधिकाधिक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. विविध औषधे घेऊन तो नियंत्रणात ठेवता येतो. पण त्यासोबतच काही व्यायाम दररोज केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी पुढील व्यायाम प्रकार करावेत. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

कार्डिओ व्यायाम ठरतो सर्वोत्तम –  हा आपल्या हृदयासाठी एक उत्तम व्यायाम मानला जातो. यामुळे शरीरातील रक्त प्रवाह जलदगतीने होतो. शिवाय मोठ्या प्रमाणात कॅलरीज जळतात. त्यामुळे हृदय निरोगी राहते. या व्यायाम प्रकारात दोरीच्या उड्या मारण्यासारखे किंवा शारीरिक कवायतीचे व्यायाम प्रकार येतात.

लिफ्टऐवजी पायर्‍या वापरा – दररोज तुम्ही घरी किंवा कार्यालयात लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचा वापर करा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कॅलरी जळतात. परिणामी हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी याची मदत होते.

स्ट्रेंग्थट्रेनिंग – स्ट्रेंग्थट्रेनिंगमुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात. त्यामुळे कार्डिओ व्यायाम करणे सोपे होते.

स्ट्रेचिंगनं करा सुरुवात – तुम्ही स्ट्रेचिंग करू शकता. परंतू हे करताना तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य पद्धत समजून घेऊन करावे. तसंच यासाठी तुम्ही योगासनेही करू शकता.