आंतरराष्ट्रीयमनोरंजन

….यामुळे अर्जून- मलायकाच्या लग्नाला सोनम कपूरचा विरोध

Newslive मराठी-  सध्या बाॅलिवूडमध्ये मलायका अरोरा आणि अर्जून कपूर यांच्या प्रेमाची चर्चा आहे. अनेक दिवसांपासून सगळ्यांपासून लपणारे दोघे आता अगदी सहज सगळ्यांसमोर वावरत आहेत.

सलमान खानची या नात्याबद्दलची नाराजी सगळ्यांसमोर आहेच अस असताना अभिनेत्री सोनम कपूर देखील या नात्यामुळे नाखूष  असल्याचं समोर आलं आहे. मलायकाचा आणि सोनमचा वाद खूप जुना आहे.

हे आहे कारण

हा वाद डिझाइनर मनीष मल्होत्राच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत झाला होता. जो कार्यक्रम करण जोहरने होस्ट केला होता. या पार्टीत मलायकाने खूप ड्रिंक्स केलं होतं. यावेळी सोनमने तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला पण उलट मलायकाच सोनम कपूरवर खूप भडकली आणि नको ते बोलली. हा हंगामा बघून करण आणि मनीषमध्ये आले. पण या दोघी तेव्हापासून एकमेकींशी बोलत नाहीत. सोनम कपूरच्या या निर्णयाने कपूर कुटुंबातच दोन ग्रुप बनले आहेत. जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांचा या लग्नाला पूर्वीपासूनच पाठिंबा आहेत. एवढंच काय तर अनिल कपूर यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त २४ डिसेंबर रोजी मलायका कपूर कुटुंबात सहभागी झाली होती.

मला परत घेऊन चल…! मलायका अरोराचा हट्ट…