देश-विदेशलक्षवेधी

पोरबंदर अभयारण्यात गर्भवती वनरक्षकासह आढळले तीन मृतदेह

Newsliveमराठी – गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील बर्दा वन्यजीव अभयारण्यात तीन मृतदेह आढळले आहेत. मृतांमध्ये सहा महिन्यांची गर्भवती महिला वनरक्षक, तिचा पती आणि गुजरात वनविभागाचा एक कर्मचारी अशा तीन व्यक्तींचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे तिघेजण बेपत्ता होते. काल (सोमवारी) त्यांचे मृतदेह जंगलात सापडल्याने या भागात मोठी खळबळ उडाली. या तिघांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोधना येथील वनरक्षक हेतल सोलंकी पती किर्ती सोलंकी आणि गुजरात वनविभागाचा कर्मचारी नागजान अगाथ या दोघांसोबत बर्दा अभयारण्याच्या भानवड परिक्षेत्रात दुपारी गस्त घालण्यासाठी गेली होती. हेतल सोलंकी हिचे पती पोरबंदर तालुक्यातील रत्ती गावात सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक होते.