महाराष्ट्र शैक्षणिक

NEET परीक्षेआधी तीन विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या

सध्या कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र काही प्रमाणावर आता परीक्षा घेतल्या जात आहेत. नुकतीच नीटची परीक्षा पार पडली. NEET परीक्षा पार पडत असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. परीक्षेपूर्वी तीन विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. शनिवारी 3 जणांनी आत्महत्या केल्यामुळे NEET परीक्षेवरून पुन्हा एकदा राजकीय नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

आत्महत्या करणाऱ्यांचं वय 19 ते 21 वर्ष असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना तमिळनाडूमधील मदुरै इथे 19 वर्षाच्या तर धर्मपुरी इथे 20 वर्षाच्या युवकानं आत्महत्या केली आहे. यापूर्वी 2017 मध्ये एका विद्यार्थिनीने NEET परीक्षा पास न झाल्याच्या धक्क्यातून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.

या तरुणीनं 12 वीमध्ये उत्तम मार्क मिळवले होते पण केवळ नीटमध्ये स्कोअर करता आला नाही म्हणून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *