देश-विदेशलक्षवेधी

बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Newsliveमराठी – जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लामधील क्रिरी सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. यामध्ये उत्तर काश्मीरमधील लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा महत्वाचा कमांडर सज्जाद हैदर, त्याचा पाकिस्तानमधील साथीदार उस्मान आणि स्थानिक सहाय्यक अनायतुला यांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

मागील चार दिवसांत दशतवाद्यांविरोधात तीन मोहिमा राबवण्यात आल्या, ज्यामध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यातील चार दहशतवाद्यांचा काश्मीरमधील टॉप टेन दहशताद्यांमध्ये समावेश होता. जवानांनी केलेली ही कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सज्जाद हैदरने अनेक तरुणांना भरकटवले होते, असेही डीजीपी दिलबाग सिंह म्हणालेत .