महाराष्ट्रलक्षवेधी

मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिलांना अटक

Newslive मराठी- सोलापूरच्या टेंभूर्णी बस्थानकात गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या तीन महिलांना टेंभूर्णी पोलिसांनी अटक केली.

शितल राहुल गायकवाड (40), कल्पना संजय गव्हाणे (30) आणि गंगा नामदेव कांबळे (30) अशी त्या अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. बसमध्ये चढताना त्या गर्दीचा गैरफायदा घेत होत्या.

दरम्यान, माढा येथील संगीता दिगांबर लांडे यांनी तक्रार देताच 24 तासांच्या आत पोलिसांनी या आरोपी चोर महिलांना अटक केली.