बारामतीमहाराष्ट्र

बारामतीमध्ये आता टोलमाफी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने बारामतीतील नागरिकांना टोलमधून माफी देण्यासाठी सुमारे 75 कोटी रुपयाची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतल्याने बारामतीतील टोल नाके येत्या 1 सप्टेंबरपासून बंद होतील. शासनाने या बाबत अध्यादेश जारी केला आहे.

आता बारामतीत प्रवेश करताना आता मालवाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाने 2003 मध्ये जवळपास 25 कोटी रुपये खर्चून बाह्यवळण रस्ते तयार केलेले होते. त्या बदल्यात बारामती नगरपालिकेच्या मालकीचा 22 एकरांचा भूखंड रस्ते विकास मंडळास हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाला होता.

बारामतीमध्ये येण्यासाठी चारही बाजूंनी टोल आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून ही मागणी होत होती. अखेर या मागणीला यश आले आहे. बारामती मध्ये एमआयडीसीलगत अनेक कंपन्या आहेत त्यामुळे मोठी वाहने जास्त प्रमाणावर येत असतात.