महाराष्ट्रलक्षवेधी

पोलीस दलाला काळिमा फासणारे 22 पोलीस बडतर्फ

पोलीस दलात बलात्कार, अपहरण आणि खंडणी, लाचखोरी आणि गैरवर्तनासारखे गंभीर गुन्हे केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांसह एकूण 22 जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. यामुळे आता जे समाजाचे रक्षक आहेत त्यांच्यावरच कारवाईमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

जानेवारीपासून आजवर ही कारवाई केली गेली आहे. या कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे दलाला काळिमा लागल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे म्हणाले, ‘गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील होण्याची प्रवृत्ती पोलीस दलामध्ये वाढत असल्याचा निष्कर्ष आकडेवारीवरून काढणे योग्य होणार नाही.

ही कारवाई 2014 पासून सुरू झालेल्या विभागीय चौकशीमध्ये आढळून आलेल्या दोषींवर केली गेली आहे. 2019 मध्ये केवळ आठ कॉन्स्टेबलला सेवेतून काढण्यात आले होते. मागील पाच वर्षांत दरवर्षी सरासरी सहा ते आठ पोलीस हवालदारांना बडतर्फ करण्यात आले आहे. यामुळे आता पोलीस दलातील या घटनांमध्ये याचे प्रमाण कमी होईल.