बातमीमहाराष्ट्र

जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्यभिषेक दिनानिमित्त वडगांव येथे वृक्षारोपण

Newslive मराठी-  अहमदनगर | पाथर्डी तालुक्यातील वडगांव येथे जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्यभिषेक दिनानिमित्त वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. गावातील तरूण मित्रांच्या सहकार्याने गावातील डोंगरावर विविध प्रकाराचे झाडे लावून पर्यावरण आणि शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. तसेच या दिनाचे औचित्य साधून ‘वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य लोककल्याणकारी होते. त्यांनी जसे प्रजेचे हित जोपासले त्याप्रमाणेच झाडांचे सुद्धा हित जोपासले होते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवराज्यभिषेक दिनाच्या निमित्ताने झाडे लावण्याचा संकल्प केल्याचे वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठानकडून सांगण्यात आले. यावेळी, गावातील तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.