बातमीमहाराष्ट्र

तक्रारवाडी गावात तरूणांच्या वतीने वृक्षारोपण

Newsllive मराठी-  कोरोनाने जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. तसेच यावर्षी कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेक रूग्णांना आपले प्राण गमावावे लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावात आज तरूणांनी वृक्षारोपण केले. तसेच स्वखर्चाने रोपे आणून तरूणांनी वृक्षारोपण करून सर्वासमोर एक आदर्श ठेवला आहे.

दरम्यान, गावात एक निसर्गरम्य वातावरण तयार व्हावे, म्हणून प्रथमतः कुदळ, टिकाव, खोरे,फावडे याच्या साह्याने त्या ठिकाणची पूर्णपणे जागा साफ करण्यात आली. व त्यानंतर खड्डे खोदून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. आणि लावलेल्या प्रत्येक झाडांचे प्राण्यापासून संरक्षण व्हावे, म्हणून झाडाभोवती काटेरी कुंपण करण्यात आले.

एवढेच नव्हे तर या तरूणांनी संपूर्ण झाडांना पाणी टाकण्याची देखील जबाबदारी घेतली आहे. जेणेकरून, पाण्याअभावी हि झाडे जळू नयेत. यावेळी प्रतिक काळंगे, रोहित मोरे, महेश वाघ, अभिजित पिसाळ, अनिकेत मोरे, ऋषिकेश मोरे, किशोर पन्हाळे, दिगंबर वाघ, रोहित खराडे तक्रारवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.