देश-विदेशलक्षवेधी

भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना जवानांनी घातलं कंठस्नान

Newsliveमराठी – भारतार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी ठार केलं आहे. पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमारेषेवर ही कारवाई करण्यात आली. घुसखोर सीमारेषा पार करुन भारतात शिरण्याचा प्रयत्न करत असतानाच बीएसएफच्या जवानांनी त्यांना पाहिलं. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत घुसखोर ठार झाले. बीएसएफकडून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवानांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता घुसखोरांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर जवानांकडूनही प्रत्युत्तर देत गोळीबार करण्यात आला. यावेळी झालेल्या गोळीबारात पाच घुसखोर ठार झाले.अजून कोणी घुसखोर लपले नाही ना याचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.