बातमीमनोरंजन

“सत्याचा विजय होईल,” FIR दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती आली समोर

Newslive मराठी- अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुशांतच्या वडिलांकडून रियावर फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे.

यानंतर रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मौन बाळगलेली रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच समोर आली आहे. रियाच्या वकिलांकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये रिया सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त करत आहे.

रिया चक्रवर्ती यामध्ये म्हणते आहे की, “मला देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय मिळेल असा विश्वास आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये माझ्याबद्दल भयानक गोष्टी बोलल्या जात असल्या तरी, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माझ्या वकिलांच्या सल्ल्याप्रमाणे मी त्यावर कोणतंही भाष्य करणार नाही”. रिया चक्रवर्तीने न्यायालयीन लढाई लढण्यासाठी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांना नियुक्त केलं आहे. त्यांच्याकडूनच हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

व्हिडीओच्या शेवटी रियाने सत्यमेव जयतेसत्याचा विजय होईल असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रिया चक्रवर्तीचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

-सुशांत नैराश्यामध्ये जाणारा व्यक्ती नाही; अंकिता लोखंडेचा खुलासा

-सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi