महाराष्ट्रराजकारण

मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न, मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही- एकनाथ खडसे

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये नाराज आहेत. सातत्याने ते पक्ष नेतृत्वावर टीका करत आहेत. मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही, मी स्वस्त बसणारा राजकारणी नाही. माझ्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणता उपद्व्याप केलेला नाही. अनेकांवर घोटाळ्यांचे आरोप झालेत सर्वांना क्लीन चिट मिळते. मग मला का ? क्लीनचिट मिळत नाही. लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होईल’, असं भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले

बाकीच्यांवर कारवाई होत नाही. माझ्यावर का कारवाई करण्यात आली. मी सातत्याने म्हणणार मी काय गुन्हा केला? माझ्यावरचे खोटे आरोप आतापर्यंत सिद्ध करू शकले नाही. बदनाम करण्यासाठी काही विशिष्ट लोकांनी मीडिया ट्रायल केली होती. जाणीवपूर्वक मला पदावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला.

भ्रष्ट लोकांना पक्षामध्ये घेतले. मात्र ज्यांनी चाळीस वर्ष जिवाचं रान केले त्यांच्या जीवाची कदर नाही का?’, असंही खडसे म्हणाले. मला बदनाम करण्याचं शल्यं माझ्या मनात आहे. त्यामुळेच भाजपा सरकार सत्तेत आले नाही. नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे हे सरकार येऊ शकले नाही, असेही खडसे म्हणाले. खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.