महाराष्ट्रराजकारण

तुकाराम मुंढेंना नागपूरकरांनी घराबाहेर पडत दिला निरोप

काही दिवसांपूर्वी नागपूरचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली. त्यामुळे ते परिवारासह मुंबईला जाण्यास निघाले. दरम्यान, त्यांच्या चाहत्यांनी शासकीय निवासस्थानी एकच गर्दी केली. तुकाराम मुंढे यांची मुंबईत जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. नागपुरातून बदली होण्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते काही दिवसांपूर्वीच कोरोनातून बरे झाले आहेत.

आज ते नागपुरातील जवाहर वसतीगृहानजीक असलेल्या शासकिय बंगल्यातून खासगी वाहनाने मुंबईला जाण्याकरीता निघाले असता त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे आभार मानण्याकरीता निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली.

एक प्रकारे मुंढे यांच्या समर्थनार्थ नागपूरकर जनता घराबाहेर पडली आहे. एक अनोखा त्यांना निरोप देण्यात आला आहे. अवघे सात महिने ते नागपुरात मनपा आयुक्त म्हणून कार्यरत होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जानेवारीमध्ये त्यांची नागपुर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती. या काळात त्यांचा अनेक राजकीय नेत्यांबरोबर संघर्ष बघायला मिळाला. त्यामुळे त्यांची बदली झाली असे देखील बोलले जात आहे.