Newslive मराठी- तापमानाचा पारा वाढतच आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे.
अनेक ठिकाणचे तापमान 40-45 अंशापर्यंत गेले आहे. त्यातच आता राज्यात विविध ठिकाणी दोन दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात 3 आणि 4 जून रोजी ठिकठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाडय़ातील लातूर जिल्ह्यमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi