महाराष्ट्र लक्षवेधी

दोन पोते कंडोम जप्त

Newslive मराठी-  औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव (कोल्हाटी) येथील कुंटणखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल दोन पोते कंडोम जप्त करण्यात आले आहेत. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या महिला, 6 वारांगणा आणि तीन ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. यावेळी रोख रक्कमही जप्त करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कुंटणखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल चासकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल वसंत शेळके, कयुम पठाण, वसंत जिवडे, रामदास गाडेकर, फकीरचंद फडे, प्रदीप कुटे, सतवंत सोहळे, बंडू गोरे, प्रकाश गायकवाड, मनमोहन कोलिमी, दीपक मतलबे, सुधीर सोनवणे, नवाब शेख यांनी शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तेथे छापा टाकला.

19 वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये तिने पहिल्यांदा केली ही गोष्ट

मुग्धा पडली प्रेमात, 18 वर्षांनी मोठा आहे प्रियकर

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *