कृषीमहाराष्ट्र

फुलशेतीतून दोन महिन्यांत दोन लाखांचे उत्पन्न, झेंडूने बहरले आयुष्य

दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतीव्यवसायात कायम तोट्यात असल्याने पाऊस आला तरी नुकसान आणि नाही आला तरी नुकसानच असे चित्र असताना भेंड खुर्द (ता. गेवराई) एका शेतकऱ्याने पारंपारिक पिकाला फाट देत हा चित्र बदला आहे.

भेंड खुर्द येथील अशोक शिंदे यांनी झेंडूचे पीक घेतले. यातून अवघ्या दोन महिन्यांत त्यांनी दोन लांखाचे उत्पन्न घेतले. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात मजुरांचा आधार न घेता शेतात राबवून २५ जूनला ३० गुंठे शेतात चार बाय दिडवर सात हजार झेंडूच्या रोपांची लागवड केली.

ठिबक सिंचनाच्या सहायाने पाण्याची बचत करीत दोन ते तीन महिन्यांत अशोक शिंदे यांची झेंडूची बाग फुलली. योग्यवेळी फवारणी व कमी प्रमाणात खताचा वापर केला. त्यासाठी त्यांना कृषिदूत रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

लॉकडाउनमुळे धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे फुलांच्या बाजार थंड आहे; पण तरीही श्री. शिंदे यांनी बाजारपेठेचा शोध घेऊन मुंबई आणि कल्याण येथे झेंडूची फुले पोचविली. त्यातून त्यांना चांगला नफा मिळाला.