महाराष्ट्रराजकारण

उद्धव ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीने एकच खळबळ; मातोश्रीवर सुरक्षा वाढवली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मातोश्री निवास्थानावर दुबई वरून अज्ञान व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली आहे. उद्धव ठाकरे यांना ठार मारणार आणि मातोश्री निवासस्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी फोनवरून दिली आहे.

दुबईहून मातोश्रीच्या लँडलाईनवर फोन केल्याही माहिती पुढे आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहीती नुसार हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मातोश्रीच्या लँडलाईनवर फोन कुणी केला याचा तपास आता सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ४ फोन काॉल दुबईच्या नंबरवरून आले.

फोन काँल मातोश्री बंगल्यावरील पोलिस आँपरेटरने घेतले होते. या घटनेनंतर ठाकरे कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोरोनामुळे सुरक्षा कमी करण्यात आली होती मात्र आता ती परत वाढवली आहे. सुरक्षा यंत्रणा देखील कामाला लागली आहे.