आंतरराष्ट्रीयराजकारण

बुरखा घालून हल्ले करणं मर्दानगी नाही- उद्धव ठाकरे

Newslive मराठी- जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून टीका करण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटले की, ‘तोंडावर बुरखा घालून काळोखात हल्ले करणं ही मर्दानगी नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे बुरखे उतरवण्याची गरज आहे. 26/11 चा मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी असेच तोंडे झाकून आले होते. आता ‘जेएनयू’त तेच दिसले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी ही घटना आहे. मोदी – शहांना जे हवं तेच घडताना दिसत आहे.’

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गोंधळ उडाला आहे व देशभरात त्यामुळे अस्थिरतेचा उद्रेक झाला. राज्याराज्यात लाखोंचे मोर्चे निघाले. हे मोर्चे फक्त मुसलमानांचे नव्हते. याप्रश्नी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी दरी पडेल व दंगली होतील अशी भाजपची आशा होती, ती फोल ठरली. या कायद्याचा फटका अनेक राज्यांत हिंदूंनाही बसत आहे.

त्यामुळे हिंदूही चिडले. या कायद्यामुळे ‘भाजप विरुद्ध बाकी सर्व’ अशी स्थिती निर्माण झाल्यानं भाजपची गोची झाली आहे व त्याच सूडभावनेतून अनेक उपद्व्याप केले जात आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा ‘राडा’ त्याचाच एक भाग आहे काय? अशी शंका आता येत आहे. ‘जेएनयू’मधील हिंसाचाराचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे.

देशातील विद्यापीठं राजकारणापासून दूर राहणं गरजेचं आहे. येथे केवळ विद्यार्जनाचंच काम व्हावं असं भाजपनं सांगितलं आहे, पण गेल्या पाच वर्षांत विद्यापीठात राजकारण आणि हिंसाचार कोणी घुसवला? जे आपल्या विचाराचे नाहीत त्यांना उखडून टाकायचे व त्यासाठी सत्तेचा मस्तवाल वापर करायचा हे धोरण कोण राबवत आहे?,’ असे प्रश्न शिवसेनेने उपस्थित केले आहेत.

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

मनसेच्या झेंड्यात होणार मोठा बदल ?